Sangli Highschool and Junior College, Sangli

नवीन माहिती

News Icon
गरीब विद्यार्थ्यी सहाय्य योजनेमध्ये प्रतिवर्षी गरीब व होतकरु मुलांना मोफत गणवेश व वहया पुस्तके देण्याची व्यवस्था.

News Icon
'संस्कार विद्यावर्धिनी' अभियानातून, शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल करणारा असा विद्यार्थी तयार करणे यासाठी हे संस्कार विद्यावर्धिनी अभियान.


सांगली हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सांगली

शाळेची वैशिष्टये

  • 1) सांगली शहराच्या मध्यवस्तीत ऐतिहासिक भव्य इमारत व प्रशस्त क्रीडांगण आणि आमराईचा निसर्गरम्य परिसर असे आनंददायी शैक्षणिक वातावरण.
  • 2) सुमारे ३२०० विद्यार्थी आणि १३९, अनुभवी निष्णात व तज्ञ अध्यापक, सेवक वर्ग असलेली जिल्हयातील सर्वात मोठी शाळा.
  • 3) आधुनिक संगणकांची उपलब्धता असलेला स्वतंत्र लठ्ठे कॉम्प्युटर अॅकॅडमी विभाग.
  • 4) प्रतिवर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी चमकण्याची गौरवशाली परंपरा.
  • 5) विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव देणार्‍या आणि अल्पावधित राज्यस्तरीय परितोषिके मिळविणार्‍या 'लठ्ठे फेस्टिव्हल' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच नामवंत नृत्यदिग्दर्शक, वादक, संगीतकार यांच्या मार्गदर्शनाखाली कला अभिनयाचे धडे दिले जातात.