जून-२००६ पासून इयत्ता ९वी व जून २००७ पासून इ. १०वी पूर्वव्यावसायिक विषयांच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. शालेय जीवनातून विद्यार्थ्यांचा भावनिक, बैध्दिक आणि कौशल्यात्मक विकास होणे गरजेचे आहे. तात्विक शिक्षणाबरोबरच व्यावहारीक आणि व्यवसाय जगाशी परिचय होणे आणि भावी जीवनाची तोंड ओळख होणे आवश्यक आहे. नैसर्गिक कल आणि आवड यांना योग्य त्या प्रोत्साहनाची जोडदेणे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी आवश्यक आहे. हे सर्व जाणूनच पूर्वव्यावसायिक विषयांची मांडणी करण्यात आली आहे. पूर्वव्यावसायिक अभ्यासक्रमात,
१) मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख (व्ही-१)
२) यंत्र अभियांत्रिकीची मूलतत्वे (व्ही-२)
३) विद्युत अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाची मुलतत्वे (व्ही-३)
या विषयांचा समावेश असून यापैकी एका विषयाची निवड विद्यार्थ्यांना करता येते.
हा अभ्यासक्रम बहुकसबी व प्रात्यक्षिकाधारित असल्याने विद्यार्थ्यांना याचा खूप उपयोग होतो.
उपयोग -अभियांत्रिकी पदविका व आय.टी.आय. प्रवेशाकरीता इ.१०वी टेक्निकल विषयासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना राखीव जागा असतात.
पेपर-१ (अभ्यासक्रमाचे नियोजन)
पेपर-२ (अभ्यासक्रमाचे नियोजन)
कार्यशाळा तंत्रज्ञान
पेपर-१ (अभ्यासक्रमाचे नियोजन)
पेपर-२ (अभ्यासक्रमाचे नियोजन)
कार्यशाळा तंत्रज्ञान