एम.सी.व्ही.सी. अभ्यासक्रम
नवीन शैक्षणिक वर्ष १९८६ च्या तरतुदीनुसार व कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार +२ स्तरावर व्यवसाय शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार करण्यास प्रवृत्त करावे याच हेतूने महाराष्ट्रात ७० टक्के व्यवसाय शिक्षणाची व्याप्ती असलेले किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम सन १९८८-८९ पासून सुरु करण्यात आले.
सध्या किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम या नावामध्ये बदल करुन एच.एस.सी. व्होकेशनल विभाग असे नाव देणेत आलेले आहे.
या विभागाकडे खालील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे.
| क्र. |
ट्रेड |
विद्यार्थी संख्या |
| 1 |
ऑटो. इंजिनिअरींग टेक्निशिअन |
२० |
| 2 |
बिल्डींग मेन्टेनन्स |
४० |
| 3 |
मेकॅनिकल टेक्नॉलॉजी |
४० |
| 4 |
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी |
२० |
| 5 |
मेंटेनन्स अॅन्ड रिपेअर्स ऑफ इलेक्ट्रीक डोमेस्टीक अप्लायन्सेस |
२० |
वरील पैकी कोणताही व्यवसाय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डिप्लोमाचा व्दितीय वर्षास थेट प्रवेश मिळू शकतो. वरील सर्व अभ्यासक्रमांना अप्रेंटिशिप योजना लागु आहे.
एम.सी.व्ही.सी. विविध उपक्रम
ऑन द जॉब ट्रेनिंग -
चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांला ऑगस्ट महिन्यापासूनच दररोज किमान दोन तास ऑन द जॉब ट्रेनिंगची योजना राबविण्यात आली आहे.
आस्थापना भेटी -
प्रात्यक्षिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांस संबंधित व्यवसायाची माहिती मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसर्या व चौथ्या शनिवारी आस्थापना भेटीचे आयोजन केले जाते.
तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व व्याख्याने -
व्यावसायिक शिक्षण घेत असताना व्यवसाय भविष्यातील संभाव्य अडचणी त्यावरील उपाय या संबंधी विद्यार्थ्यांना जागृतीसाठी वेळोवेळी तज्ञ प्रतिष्ठित व्यावसायिकांचे व्याख्याने आयोजित केली जातात.
भरती मेळावा -
विविध व्यवसायातील आस्थापनाच्या प्रमुखांना बोलावून कॅम्पस इंटरहयुची योजना राबविली जाते. गतवर्षी एल.जी., कंपनीमध्ये ३० विद्यार्थ्यांची अॅप्रेंन्टीसशीप साठी निवड झालेली आहे.
उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना -
उत्पादनाभिमुख योजनेची प्रभावी व कार्यक्षमपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या विहित पध्दतीचा व मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही केली जाते.
समन्वय व सल्लागार समिती -
एच.एस.सी. व्होकेशनल विभागातून दिले जाणारे शिक्षण हे जास्तीत जास्त सुसंगत व परिणामकारक व्हावे, विद्यार्थी रोजगार व स्वंयरोजगारास सक्षम व्हावा या उद्देशाने समन्वय व सल्लागार समितीची स्थापना केलेली आहे.
फॉलो अप रजिस्टर -
व्यावसायिक अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांचा व्यावसायिक विकास, प्रगति याची नोंद मागील तीन वर्षापासून घेतली जाते.
आधुनिक शिक्षण पध्दती -
काळाची गरज लक्षात घेवून विद्यार्थ्यांचा गुणात्मक व दर्जात्मक विकास होणेसाठी विद्यार्थ्यांना एल.सी.डी. व लॅपटॉपच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविले जातात. आध्यापकांचा जास्तीत जास्तवेळ अभ्यासक्रम शिकवण्याकडे मिळावा यासाठी वेळेची बचत म्हणून संगणकीय हजेरीपत्रकचा वापर केला जातो. त्याच प्रमाणे सर्व परीक्षांचे संगणकीकृत निकाल विद्यार्थ्यांना दिले जातात.