Sangli Highschool and Junior College, Sangli

नवीन माहिती

News Icon
गरीब विद्यार्थ्यी सहाय्य योजनेमध्ये प्रतिवर्षी गरीब व होतकरु मुलांना मोफत गणवेश व वहया पुस्तके देण्याची व्यवस्था.

News Icon
'संस्कार विद्यावर्धिनी' अभियानातून, शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल करणारा असा विद्यार्थी तयार करणे यासाठी हे संस्कार विद्यावर्धिनी अभियान.


ज्युनिअर कॉलेज विभाग

Junior College

ज्युनिअर कॉलेज

 • 1) सुरभि भित्तीपत्रक - विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून सुरभि भित्तीपत्रक हा उपक्रम सुरु आहे. या उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता, वात्रटिका, विनोद, स्फूट लेख इ. वाङ्‌मय तसेच चित्रे, व्यंगचित्रे काचफलकात प्रसिध्द केली जातात.
 • 2) वाङ्‌मय, वक्तृत्व व निबंध स्पर्धा - विद्यार्थ्यांत वाङ्‌मयविषयक अभिरुची संपन्न व्हावी, त्यांच्या वाचन लेखन गुणांचा विकास व्हावा, विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन त्यांनी यश संपादन करावे यासाठी तज्ञ प्राध्यापक विशेष मार्गदर्शन करतात.
 • 3) व्यवसाय मार्गदर्शन व विद्यार्थी कल्याण मंडळ - उच्च माध्यमिक शिक्षणानंतर व्यवसाय मिळणे सोयीचे जावे यासाठी विविध व्यवसाय तज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. या विषयातील शासकीय अधिकार्‍यांना पाचारण करुन शासनामार्फत विविध व्यवसायांना कोणत्या प्रकारची आर्थिक मदत केली जाते, या विषयी महत्वपूर्ण माहिती विद्यार्थी मंडळामार्फत विद्यार्थ्यांना दिली जाते.
 • 4) ऑलिंपियाड परीक्षा - इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टिचर्स व होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खालील परीक्षांचे आयोजन केले जाते.
  1. National Standard Examination in Physics (NSEP)
  2. National Standard Examination in Chemistry (NSEC)
  3. National Standard Examination in Biology (NSEB)
  4. National Standard Examination in Astronomy (NSEA)
  तसेच भास्कराचार्य प्रतिष्ठान-पुणे मार्फत घेतल्या जाणार्‍या Regional Mathematics Olympiad (RMO) या सर्व स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन व विनामूल्य मार्गदर्शन केले जाते.
 • 5) सामाजिक दायित्व - सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून पल्सपोलिओ, स्वच्छता अभियान, प्रदुषण, व्यसनमुक्ती या सारख्या सामाजिक, राष्ट्रीय उपक्रमात विद्यार्थी व शिक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो.