Sangli Highschool and Junior College, Sangli

नवीन माहिती

News Icon
गरीब विद्यार्थ्यी सहाय्य योजनेमध्ये प्रतिवर्षी गरीब व होतकरु मुलांना मोफत गणवेश व वहया पुस्तके देण्याची व्यवस्था.

News Icon
'संस्कार विद्यावर्धिनी' अभियानातून, शिक्षकांच्या माध्यमातून प्रश्नांची उकल करणारा असा विद्यार्थी तयार करणे यासाठी हे संस्कार विद्यावर्धिनी अभियान.


आवाहन

Suresh Patil
मा. सुरेश पाटील
''शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रधान साधन आहे. समाज-जीवनाच्या गरजा, आशा, आकांक्षा व ध्येये यांच्याशी शिक्षणाचा फारच जवळचा संबंध आहे. त्यामुळे गेल्या दीड-दोनशे वर्षामध्ये झालेल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तनाबरोबरच शैक्षणिक परिवर्तनही घडून आले आहे. किंबहुना शैक्षणिक परिवर्तन घडून आल्यामुळेच सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तनास नवनव्या दिशा मिळत गेल्या''. आणि हेच खरे शिक्षण होय.
V.T.Chougule
मा. सुहास पाटील
''शिक्षण हे मानवी संस्कृतीच्या संवर्धनाचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे. सामाजिक मुल्यांबाबतचा विवेक निर्माण करण्यासाठी लोकशाहीच्या शस्त्रागारातील शिक्षण हे एक मुख्य शस्त्र आहे. शिक्षणाचा संबंध सतत विकसित होत असलेल्या 'माणसा'शी आहे की जो 'माणूस' समाजात राहतो. म्हणूनच शिक्षणाची कल्पना ही स्थितिशील नसून गतिशील आहे.